नवी दिल्ली । भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने पुन्हा एकदा एकाचवेळी अनेक उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित करुन आपले कौशल्य सिद्ध केले आहे. इस्त्रोने शुक्रवारी सकाळी झडङत-उ38 रॉकेटव्दारे 31 उपग्रहांचे प्रक्षेपण केले. सकाळी 9 वाजून 29 मिनिटांनी PSLV-C 38 रॉकेटने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन उड्डाण केले. त्यानंतर 16 मिनिटांनी पीएसएलव्हीने कार्टोसॅट – 2 मालिकेतील उपग्रहासह अन्य 29 नॅनो उपग्रहांना आपल्या कक्षेत सोडले. इस्त्रोच्या पीएसएलव्हीचे हे 40 वे उड्डाण होते. 31 उपग्रहांमध्ये भारताचे दोन आणि 29 परदेशी उपग्रह आहेत. या उपग्रहांमध्ये कार्टोसॅट -2 मालिकेतील सहावा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला असून कार्टोसॅटमुळे भारताची टेहळणी क्षमता वाढणार आहे.
14 देशांचे 29 नॅनो उपग्रह सुद्धा प्रक्षेपित
कार्टोसॅटचे वजन 712 किलो असून, अन्य 30 उपग्रहांचे मिळून 243 किलो वजन आहे. फ्रान्स, जर्मनी, इटली, जापान असे 14 देशांचे 29 नॅनो उपग्रह सुद्धा प्रक्षेपित करण्यात आले आहेत. तामिळनाडूसाठी सुद्धा हे प्रक्षेपण महत्वाचे आहे. कारण कन्याकुमारी जिल्ह्यातील नुरुल इस्लाम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनवलेला उपग्रह अवकाशात पाठवण्यात आला आहे. शेती पीक आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये या उपग्रहाची मदत होईल. इस्त्रोने याआधी फेब्रुवारी महिन्यात एकाचवेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करुन इतिहास रचला होता.
यापुर्वि एक्सएल व्हॅरिएंट चांद्रयान व मंगळ मोहिमेसाठी
झडङत- उ37 या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.रशियाच्या अंतराळ संस्थेने एका वेळी 37 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. त्या तुलनेत भारताचे हे यश मोठे आहे. यापूर्वी भारताने जून 2015 मध्ये 23 उपग्रहांचे एकाच वेळी प्रक्षेपण केले होते. भारतीय शास्त्रज्ञांनी एक्सएल व्हॅरिएंट या रॉकेटचा वापर केला असून सर्वांत शक्तिशाली या रॉकेटचा वापर यापूर्वी भारताने महत्त्वाकांक्षी चांद्रयान व मंगळ मोहिमेसाठी केला होता.
पृथ्वीवर देखरेख ठेवण्यासाठी उपयुक्त
पीएसएलव्हीने 214 किलो वजनाच्या कार्टोसॅट-2 साखळीतील उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. त्याचा उपयोग पृथ्वीवर देखरेख ठेवण्यासाठी केला जाईल. त्यानंतर 103 सहयोगी उपग्रहांना पृथ्वीपासून 520 कि.मी. अंतरावरील कक्षेत समाविष्ट केले जाईल.त्यांचे एकूण वजन 664 आहे. यातील 96 उपग्रह अमेरिकेचे आहेत, तर पाच उपग्रह हे इस्रोचे आंतरराष्ट्रीय ग्राहक इस्रायल, कजाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिरातचे आहेत.
PSLV-C38 Successfully Launches Cartosat-2 Series Satellite along with 30 Co-passenger Satelliteshttps://t.co/cB4xCOOZ0a
— ISRO (@isro) June 23, 2017