इस्त्रो डिसेंबरमध्ये करणार उपग्रह प्रक्षेपण

0

नवी दिल्ली । ऑगस्टअखेर झालेल्या अयशस्वी उपग्रह प्रक्षेपणानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो पुन्हा नव्या दमाने कामाला लागली आहे. येत्या डिसेंबरमध्ये पुन्हा उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. IRNSS-1क या उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी ठरले होते. याच्या अपयशाची कारणे शोधण्यासाठी इस्रोने एक सत्यशोधन समिती नेमली होती. ही समिती लवकरच आपला अहवाल सादर करेल. त्यानंतर इस्रो पुढील प्रक्षेपणाच्या तयारीला लागणार आहे.

’आम्ही नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये पुन्हा प्रक्षेपणांच्या कामांना सुरूवात करू,’ असे इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांनी सांगितले.तिरुवनंतपुरममधील विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक डॉ. के. सिवन म्हणाले, ’आम्ही एकतर कार्टोसॅट-2 श्रेणीतलं रिमोट सेंसिंग सेटेलाइट लॉन्च करू किंवा IRNSS-1ख हे आधीच्या अपयशी ठरलेल्या उपग्रहातच बदल करून तो नोव्हेंबर, डिसेंबरअशेर प्रक्षेपित करू. या दोनपैकी कोणता उपग्रह आधी प्रक्षेपित करायचा यावर अद्याप निर्णय झालेला नाही.’