इस्त्रो प्रमुखांना अश्रू अनावर; मोदींनी खांद्याचा आधार देत दिला धीर

0

बंगळुरू: कालची रात्र संपूर्ण भारतीयांसाठी एक ऐतिहासिक रात्र होती. भारतीय बनावटीच्या चांद्रयान-२ चंद्रावर उतरणार होते. मात्र २ किलोमीटर अंतर असतानाच यान आणि ‘इस्रो’च्या कंट्रोल रुमचे संपर्क तुटले. त्यामुळे भारताची पदरी निराशा पडली. मात्र या मिशनसाठी देशभरातून भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक होत आहे. मोठ्या प्रमाणात परिश्रम घेऊन मिशनला यश आले नसल्याने भारतीय शास्त्रज्ञांना भावना अनावर झाले आहे. सकाळी ८ वाजता देशाला उद्देशून पंतप्रधान मोदींनी भाषण केले, भाषणानंतर मोदींनी इस्रो कंट्रोलरुमचा निरोप घेतांना इस्रोचे प्रमुख के. सिवन यांची भेट घेतली, त्यावेळी सिवन यांना अश्रू अनावर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिवन यांचे सांत्वन केले. मोदींनी स्वत:च्या खांद्याचा आधार सिवन यांना देत आधार दिला. हा क्षण अत्यंत भावनिक होता.

भाषण संपल्यानंतर पंतप्रधान मोदी सर्व शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी कंट्रोल रुपमध्ये फिरले. प्रत्यकाच्या हाताशी हात देत मोदींनी सर्वांचे अभिनंदन, कौतुक करत धीर दिला. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व शास्त्रज्ञांना भेटत होते, त्याच वेळी इस्रोचे प्रमुक के. सिवन यांचे ह्रदय जडावल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. जेव्हा पंतप्रधान मोदी सिवन यांच्या जवळ आले तेव्हा सिवन यांनी त्यांना भेटण्यासाठी आपला हात पुढे केला. मात्र, त्यांचा हात हातात घेत मोदी यांनी त्याना जवळ घेत मिठी मारली. त्यानंतर सिवन यांनी आपल्या डोळ्यांवरील चष्मा काढून टाकला आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली. त्यावेळी इस्रो कंट्रोलरुममधील उपस्थित सर्व शास्त्रज्ञ भावुक झाले होते.