श्रीहरीकोटा । भारतीय अंतराळ संस्था अर्थात ‘इस्रो’ने पहिल्यांदाच प्रायव्हेट कंपन्यांच्या मदतीने केलेले आठवे रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट लॉन्चिंग फेल ठरले आहे. चीफ किरण कुमार यांनी मिशन अयशस्वी ठरल्याचे जाहीर केले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून ‘खठछडड 1क’ हा उपग्रह पीएसएलव्ही सी 39 च्या मदतीने अंतराळात सोडण्यात येणार होता.
1400 किलोहून अधिक वजन
नाविक शृंखलेतल्या 7 उपग्रहामंध्ये हा उपग्रह समाविष्ट झाला असता. या 1400 किलोहून अधिक वजनाच्या उपग्रहाची निर्मिती ‘इस्रो’सह 6 अन्य छोट्या (वैज्ञानिक) खाजगी संस्थांनी केली आहे. यामध्ये खाजगी संस्थांचं योगदान 25 टक्के आहे. हा उपग्रह लोकेशन बेस्ड सर्व्हिसेस, जसं की रेल्वेंचे सर्वेक्षण आणि ट्रॅकिंग यांसाठी महत्त्वाचा ठरणार होता. तर मासेमारी क्षेत्रासाठीही हा उपग्रह उपयोगी ठरण्याची शक्यता होती.
5 देशांची स्वतःची सिस्टम
या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर भारतही आपला नेव्हिगेशन सिस्टम तयार करणार्या देशांच्या यादीत गणला जाईल अशी अटकळ होती. अमेरिका, रशिया, युरोप, चीन आणि जपान या देशांची स्वतःची नेव्हिगेशन सिस्टम आहे. अमेरिकेची ग्लोबल पोजिशनिंग, रशियाची ग्लोनास, यूरोपची गॅलीलियो, चीनची बेदोऊ, जपानची कवासी जेनिथ सॅटेलाईट सिस्टम आहे.