जळगाव : शहरातील इस्लामपूरा भागात किरकोळ कारणावरून दोन जणांना फायटरने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शनी पेठ पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
सैय्यद साजीद अली (46, रा.ईस्लामपूरा, भवानीपेठ) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवार, 8 एप्रिल रोजी ईस्लामपूरा भागात लाईट गेलेली होती. केबल वायर खराब झाल्याने केबल दुरूस्तीसाठी महावितरणचे कर्मचारी दुरूस्तीसाठी आले होते. दरम्यान, ईलेक्ट्रीक केबल वायर ही गल्लीतील वसीम शेख सत्तार यांच्या घराजवळून गेली होती. केबल वायर दुरूस्तीसाठी आलेल्या महावितरण कर्मचार्यांना वसीम शेख सत्तार याने नवीन केबल टाका आता ही वायर टाकू नका, असे सांगितले. यावेळी सैय्यद साजीद अली आणि त्यांचा भाऊ सैय्यद वाजीद सैय्यद आबीद यांना वसीम शेख सत्तार, गफ्फार शेख सत्तार, हकीम भाई यांनी फायटरच्या सहाय्याने मारहाण केली. यात सैय्यद साजीद अली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे. याबाबत शनीपेठ पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.