कराची । पीपीएलचे विजेता पेशावर झल्मी च्या संघ मालकाने वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डॅरेन सॅमी लवकरच इस्लाम धर्माचा स्विकार करेल, अशी आशा आहे. तो दिवस माझ्यासाठी खूप मोठा दिवस असेल, असे विधान पेशावर झल्मी संघाचा मालक जावेद आफ्रिदी याने केले.
पेशावर झल्मी संघाकडून डॅरेन सॅमी खेळलेला आहे. सॅमीला इस्लाम धर्म जाणून घेण्याची इच्छा असून तो त्याबाबत अभ्यास करत असल्याचेही त्याने सांगितले. इस्लाम धर्माबाबत अभ्यास करत आहे. तो नक्कीच एक दिवस या पवित्र धर्माचा स्विकार करेल, असे आफ्रिदी म्हणाला.