इ-स्कूटर सेवेला प्रारंभ

0

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपळे सौदागर-नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांच्या पुढाकारातून ‘ग्रीन सौदागर क्लिन सौदागर’ या संकल्पनेतून प्रथमच पिंपळे सौदागर येथे हिरो कंपनीची लीप इ-स्कुटर सेवा रविवारी 03 मार्चपासून कार्यरत करण्यात आली आहे. या इ-स्कूटर सेवेचे उदघाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या काही दिवसा पूर्वी प्रथम टप्यात ट्रायल बेसेसवर विस इ-स्कुटरचे नियोजन करण्यात आले होते, रविवारी शिव छत्रपती शिवाजी महाराज लिनियर अर्बन गार्डन येथे या इ-स्कूटरचे उदघाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते क रण्यात आले. पवना सहकारी बँकेचे व्हाइस चेअरमन जयनाथ काटे, उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, चंदा भिसे, भानुदास काटे पाटील, शंकर काटे, दत्तोबा काटे, शेखर कुटे, प्रकाश झिंजुर्डे,.पोपट काटे, विशाल शिंदे, राहुल सरोदे,विकास काटे ,संजय भिसे, प्रविण कुंजीर, गणेश झिंजुर्डे, .नितीन कुंजीर, अमोल थोरात, दिपक गांगुर्डे आदी उपस्थित होते.

संकल्पना प्रथमच अमलात
इ-स्कुटर अँड्राईड अ‍ॅपने चालु किंवा बंद करता येते ही स्कुटर इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे एकदा फुल्ल चार्ज केल्यावर 60 कि.मि.चालवता येते ह्या इ-स्कुटर ला चार्जिंगसाठी 4 ते 5 तास लागतात इ-स्कुटरची टॉप स्पीड ही 25 कि.मि. प्रति तास आहे. वाढती महागाई आणि वाढते प्रदूषनाला आळा घालण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांनी ही संकल्पना प्रथमच पिंपळे सौदागर रहिवाशांसाठी इ-स्कुटर ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

पैसे द्यावे लागणार
इ-स्कुटर चालवण्यासाठी पाहिले 15 मि. राईड फ्री असणार आहे त्यानंतर इ-स्कुटर चालवण्यासाठी 1.50 रु पर मिनिट आहे पैसे पेड करण्यासाठी युपीआय अप्स द्वारे पैसे पेड करून इ-स्कुटरचा आनंद नागरिकांना घेता येईल. नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे पिंपळे सौदागर मधील नागरिकांच्या स्वास्थ व आरोग्याची काळजी घेत पिंपळे सौदागरमध्ये अनेक ठिकाणी असलेले पेडल सायकल पॉईंट आहेत त्याच ठिकाणी या इ-स्कुटर पॉईंट आणि इ-स्कुटर चार्जिंग पॉईंट असल्याचे नियोजन केले आहे.