ईगतपुरीत ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक : तीन दिवस मुंबई पॅसेंजर रद्द

0

अनेक गाड्या धावणार विलंबाने ; एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गातही बदल

भुसावळ- मध्य रेल्वेच्या ईगतपुरी स्थानकावर फूट ओव्हर ब्रिज गर्डर बसविण्यासाठी विशेष ट्रॉफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येत असून 11 रोजी सुटणारी मुंबई-भुसावळ व 12 व 13 रोजीची भुसावळ-मुंबई पॅसेंजर रद्द करण्यात आली असून अनेक गाड्या विलंबाने धावणार असून काही गाड्यांच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे. 11 रोजी पहाटे 3.45 ते दुसर्‍या दिवशी सकाळी 10.25 वाजेदरम्यान ब्लॉकचा कालावधी असणार आहे.

मुंबई पॅसेंजर रद्द ; अनेक गाड्या विलंबाने धावणार
11 रोजी मुंबई येथून सुटणारी 51153 मुंबई-भुसावळ पॅसेंजर तसेच 12 रोजी सुटणारी गाडी क्रमांक 51154 भुसावळ-मुंबई पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे तसेच 12 रोजी गाडी क्रमांक 15645 लोकमान्य टिळक टर्मिनस-गुवाहाटी एक्सप्रेस सकाळी 8.5 ऐवजी सकाळी 9.10 वाजता सुटेल तसेच गाडी क्रमांक 17617 सीएसएमटी मुंबई-हुजुर साहेब नांदेड तपोवन एक्सप्रेस 6.15 ऐवजी 9.05 वाजता सुटणार आहे. 13 रोजीदेखील विलंबांने गाड्या धावणार असून त्यात गाडी क्रमांक 12519 लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्या एक्सप्रेस 7.50 ऐवजी 9.10 वाजता तर गाडी क्रमांक 12336 लोकमान्य टिळक टर्मिनस-भागलपुर एक्सप्रेस 8.5 ऐवजी 9.30 वाजता व गाडी क्रमांक 17617 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हुजुर साहेब नांदेड एक्सप्रेस 6.15 ऐवजी 9.05 वाजता सुटेल.

या गाड्यांच्या मार्गात बदल
12 रोजी 11067 एलटीटी-रायबरेली साकेत एक्स्प्रेस दिवा-वसई रोड-जळगावमार्गे जाईल तर 12859 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा गीतांजली एक्सप्रेस कल्याण-दौंड-मनमाड मार्गे जाईल तसेच 15017 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर काशी एक्सप्रेस दिवा-वसई रोड-जळगाव मार्गे पुढील नियोजित स्थळी जाईल. 13 रोजी 22129 लोकमान्य टिळक टर्मिनस-अलाहाबाद एक्सप्रेस दिवा-वसई रोड-जळगावमार्गे तर 12859 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा गीतांजली एक्सप्रेस कल्याण-दौंड-मनमाड मार्गे व 15017 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर काशी एक्सप्रेस दिवा-वसई रोड-जळगावमार्गे धावणार आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.