Illegal teak wood worth one lakh seized between Echkheda-Kingaon यावल : तालुक्यातील ईचखेडा ते किनगाव दरम्यान वनविभागाच्या पथकाने दुचाकीव्दारे अवैधरीत्या सागवान लाकडाची वाहतूक रोखत दुचाकीसह एक लाखांचे सागवान लाकूड जप्त केले. या कारवाईने अवैधरीत्या लाकडाची वाहतूक करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली. दरम्यान, वनविभागाच्या पथकास पाहुन अज्ञात चोरट्याने मुद्देमाल सोडून पळ काढला.
पथकास पाहताच संशयीताने ठोकली धूम
यावल प्रादेशिक वनविभाग पश्चिमचे वनक्षेत्र अधिकारी एस.टी.भिलावेसह कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना ईचखेड- किनगाव रस्त्याने अवैधरीत्या मोटरसायकलवर सागवान लाकुडचे कट साईजचे 10 नग वाहतूक करीत असताना एक संशयीत नजरेस पडला. संशयीताचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता पथकास पाहुन अज्ञात चोरट्याने वाहनासह सागवान लाकुड रस्त्यावर सोडून शेत-शिवारातून पळ काढला. दुचाकी वाहन व सागवान लाकूड मिळून एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.