मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘कोहिनूर स्क्वेअर’मधील कथित गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठविली आहे. २२ रोजी त्यांची चौकशी होणार आहे. दरम्यान राज ठाकरे यांना पाठवलेल्या नोटिशीच्या पार्श्वभूमीवर मनसेची महत्त्वाची बैठक आज मंगळवारी दादर येथे होत आहे. या बैठकीत राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका मांडणार याकडे लक्ष लागले आहे. मनसेचे सर्व नेते व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. भाजप सरकारने राजकीय सूडबुद्धीने राज ठाकरे यांच्यावर कारवाई करत असल्याचा आरोप आहे. विरोधकांच्या गोटातूनही त्यांना पाठिंबा मिळत आहे.