मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात शुक्रवारी स्वत:च उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यामुळे ‘ईडी’समोरच पेच निर्माण झाले होते. त्यामुळेच ईडीने शरद पवार यांना पत्र पाठवून कार्यालयात न येण्याची विनंती केली होतील. त्यामुळे शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयात जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आता शरद पवार पुणे दौऱ्यावर जात आहे. पुण्यात भीषण पुरामुळे जनजीवन विष्कळीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार पुणे दौऱ्यावर जात असून पूरग्रस्तांची भेट घेणार आहे.
शरद पवार पुणे दौऱ्यावर रवाना होणार असून राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ ईडीच्या कार्यालयात जाऊन निवेदन देणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी भेट घेतली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. माझ्यामुळे कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केल्याची माहिती शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.