जळगाव- महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालकावर ईडीने गुन्हा दाखल केलेला आहे. जिल्हा बँकेचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर काही वर्ष संचालक होतो.परंतु यात कोणत्याच प्रकारे गैरव्यवहार केलेला नाही.बँकेकडून मिळणार्या सोयी सुविधा,भत्ते देखील घेतलेले नाहीत.अगदी स्वच्छ आहे.त्यामुळे तपासात ईडीला सहकार्य करणार असे म्हणत कायदेशीर प्रक्रीयेतून निर्दोष सिध्द होईल असा विश्वास माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
राज्य सहकारी बँकेच्या काही बैठकांना हजर होतो. संचालकांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी अधिकार्यांच्या माध्यमातून केली जाते. नाबार्डने देखील अधिकार्यांवर ठेवला होता.दरम्यान, उच्च न्यायालयाने पदाधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले .त्यानुसार ईडीने संचालकांवर गुन्हा दाखल केलेला आहे.तपासासाठी ईडी जेव्हा जेव्हा बोलवेल तेव्हा तेव्हा चौकशीला सामोरे जाऊन तपासात सहकार्य करणार असल्याचे ईश्वरबाबूजी यांनी सांगितले.
25 ते 30 लाखांची जबाबदारी अमान्य
सहकार कायदा कलम 88 अन्वये चौकशी झाली तेव्हा संचालक म्हणून माझ्यावर 25 ते 30 लाखांची जबाबदारी निश्चित करण्यात आली.यासंदर्भात नोटीस देखील आल्या होत्या. मात्र निश्चित केलेली रक्कम देखील अमान्य असल्याचे माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन यांनी सांगितले. 40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत कधीही दुरुपयोग केला नसल्याचेही ते म्हणाले.
निर्दोष सिध्द होतील
राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी कायदेशीर प्रक्रियेतून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निर्दोष सिध्द होतील असा विश्वास माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन यांनी व्यक्त केला.तसेच यात कोणतेही राजकारण नाही असे सांगून काँग्रेस सरकारच्या काळातच पृथ्वीराज चव्हाण यांनी संचालक मंडळ बरखास्त केले होते असेही ईश्वरबाबूजी यांनी सांगितले.