भुसावळ विभागात रमजान ईद उत्साहात ; हिंदू बांधवांनी दिल्या मुस्लीम बांधवांना शुभेच्छा
फैजपूर/निंभोरा- राज्यात भरपूर पाऊस पडू दे, देशात सर्वत्र शांतता नांदू दे, सामाजिक सलोखा अबाधीत रहावा, अशी प्रार्थना रमजान ईदनिमित्त भुसावळ विभागात सर्वत्र ईदगाह मैदानावर करण्यात आली. ठिकठिकाणी ईद उल फित्रची सामूहिक नमाज अदा करून ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. पोलिस प्रशानातर्फे मुस्लीम बांधवांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.
समतेचा विचार पुढे नेण्याचा संकल्प
निंभोरा- समतेचा विचार सर्वांगीण विकासाचा धागा असतो त्यासाठी बंधूभाव व परस्पर स्नेहभाव दृढ करण्याचा संकल्प निंभोरा येथे आयोजित ईद मिलन कार्यक्रमप्रसंगी मान्यवरांनी केला. जनसंग्राम बहुजन लोकमंच सामाजिक विकास संघटना व निंभोरा पोलिस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी रमजान ईद निमित्त येथील इदगाह मैदानासमोर ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक एकता अखंड राहण्यासह भरपूर पाऊस व नैसर्गिक सुबत्ता अबाधीत राहावी म्हणून ईद निमित्त मुख्य नमाज पठण करतांना निंभोरा व बलवाडी येथील मुस्लिम बांधवांनी प्रार्थना केली. हजरत मौलाना नईम अख्तर रजा यांनी उपस्थित बांधवांना नमाज पठण करवली.
मुस्लीम बांधवांना दिल्या शुभेच्छा
जनसंग्राम संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे ,निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे, बहुजन एकता मंचचे वाय.डी.पाटील, शिवनेरी मित्र मंडळाचे अध्यक्ष अमोल चौधरी, आकाश बोरसे, ललित पाटील, आकाश भोंगे, अक्षय चौधरी, रीतेश येवले, संदीप मोरे, सुनील सुतार, उत्तम बारी, प्रा.संजय मोरे, बबुवा गुप्ता, मनिषा ठाकरे आदींनी सर्व नमाज करून आलेल्यांना गुलाबपुष्प व शीतपेय वाटप करून शुभेच्छा दिल्या.
यांची होती उपस्थिती
ग्रामपंचायत सदस्य मुजाहीद शेख, युनूसखा शफीखा, बबलू पटेल, हबीबखा तबीबखा, शकील खाटीक, करीम मन्यार, सरफराज खान, मुन्ना पिंजारी, आरीफ मिस्तरी, रमजू पटेल, शोएब खाटीक, दस्तगीर खाटीक, हुसैनखा इमामखा, शेख बालू मुनीर, हसन अकबर शेख, नूरखा मिस्तरी, इकबाल शेख गुलाब, सलीम मोहिद्दीन पटेल, दिलशाद शेख, आलमगीर पठाण, युनूस गॅरेजवाले, फारुख कुट्टीवाले, सादिक शेठ हरदेवाले, दस्तगीर खाटीक, शेख बालू शेख सरदार,मुज्जफर पटेल, राज खाटीक, फिरोज खाटीक, इसाक पटेल, सोहेल शेख सांडू, इस्माईल टेलर्स, रीजवान पटेल आदींनी शुभेच्छा स्विकारल्या. यशस्वीतेसाठी हवालदार सुधाकर पाटील, सुमित वराडे, स्वप्नील पाटील, होमगार्ड संतोष काटोले आदींनी सहकार्य केले.
फैजपूरला शांतता नांदण्यासह पावसासह दुवा पठण
फैजपूर- फैजपूर येथे ईदगाह मैदानावर ईद उल फित्रची सामूहिक नमाज अदा करून ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. फैजपूर शहराच्या उत्तरेस असलेल्या ईदगाह मैदानावर बुधवारी सकाळी साडेआठ वाजता शहरातील मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. यावेळी जामा मशीदचे पेश इमाम ताहेर पटेल यांनी खुदबा पठण करून पवित्र रमजानचे महत्व सांगितले. सामूहिक दुआ पठण करण्यात आले. देशभरात शांतता बंधूभाव नांदावा तसेच पाण्यामुळे दुष्काळ परीस्थिती निर्माण झाल्याने चांगल्या प्रकारे पाऊस व्हावा यासाठी सामूहिक दुआ करण्यात आली. यावेळी शहरातील सर्व मशिदींचे मौलवी व शहरातील हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते.
पोलिस प्रशासनातर्फे गुलाबपुष्प देवून स्वागत
ईदगाह मैदानावर नमाज अदा झाल्यानंतर फैजपूर पोलिस ठण्यातर्फे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुलाबपुष्प देऊन मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी , भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, ध.ना.महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.जी.पी.पाटील, फैजपूर मंडळाधिकारी बंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान, नगरसेवक कलीम मण्यार, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र होले, भाजपा शहराध्यक्ष संजय रल, मलक आबीद, शेख रीयाज, शेख जफर, रघुनाथ कुंभार यांच्यासह अनेकांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी ईदगाहजवळ खान्देश नारी शक्ती ग्रुप व दीपाली ग्रुप फैजपूरतर्फे पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली.