नागरिकांसह पोलीस कर्मचार्यांसह दुचाकीही केल्या जमा
जळगाव- पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक शाखेतर्फे सुन्नी ईदगाह मैदानाबाहेर बेशिस्तपणे 19 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ही वाहने वाहतूक शाखेत जमा करण्यात आली आहे. या दोन चारचाकी तसेच इतर दुचाकींचा समावेश आहे. विशेष अधीक्षक डॉ. उगले यांनी कुठलीही हयगय न करता बेशिस्तपणे उभी पोलीस कर्मचार्यांही वाहने जमा करण्याचे आदेश दिले.
सोमवारी बकरी ईद असल्याने नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्मिल बांधव एकत्र आले.यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, अनुचित प्रकार घडू नये म्हणून खुद्द पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी हजेरी लावली होती. यावेळी बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. मैदानाबाहेर मुस्लिम बांधवांसह काही पोलीस कर्मचार्यांनी बेशिस्तपणे आपली वाहने उभी केली होती. या वाहनांवर पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांची नजर पडली. वाहतुकीस अडथळा निर्माण होवू नये म्हणून उगले यांनी तत्काळ वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक देविदास कुनगर यांना वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिली. कुनगर यांनी दोन चारचाकीसह 19 वाहने ताब्यात घेत वाहतूक शाखेत आणली. यातील काही वाहनांना जॅमर लावण्यात आले होते. 400 रुपयांची दंडात्मक कारवाई करत दुचाकी सोडून देण्यात आली.
कर्मचार्यांनी वाहने सोडू नका
आपली वाहने घेवून जाण्यासाठी काही कर्मचार्यांनी शहर वाहतूक शाखा गाठली. परवानगी शिवाय कर्मचार्यांची कुठलीही वाहने सोडू नये अशी ताकीदच यावेळी डॉ. उगले यांनी वाहतूक शाखेच्या निरिक्षकांना दिली होती. त्यानुसार पोलीस कर्मचार्यांनाही इतरांप्रमाणे दंड भरुनच आपली वाहने घेवून जाता आली. दंड न भरलेली वाहने उशीरापर्यंत पोलीस वाहतूक शाखेतच होती.