ईदची वर्गणी न दिल्याने तलवारीने वार

0

पुणे : रमजान ईदची वर्गणी दिली नाही म्हणून दापोडी येथे एकावर वार करण्यात आला आहे. नूर रशीद बदनकारी (वय 28 रा. न्यू गुलाब नगर, दापोडी) असे वार करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून या हल्ल्यात नूर गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी फिरोज शेख, जुबेदा शेख, ईब्राहीम शेख व त्यांचे साथीदार असे मिळून 11 जणांविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

परस्परविरोधी गुन्हा दाखल
ईदसाठी वर्गणीची मागणी केली असता वर्गणी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी नूर याच्यावर तलवारीने वार केले. तर मुन्ना उर्फ मोहीद्दीन रफीख (वय.22 रा, दापोडी) यांनी नुर रशीद बदनकारी व त्यांच्या 8 साथीदारा विरुद्ध परस्परविरोधी तक्रार दिली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला असून भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.