ईदच्या दिवशीच सीमेवर केला बेछूट गोळीबार

0

जम्मू – ऐन दिवशीही पाक पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचा भंग करीत सोमवारी रात्री स्वयंचलित शस्त्रांनी सीमेवरील भारतीय छावण्यावर गोळ्यांचा व बॉम्बगोळ्यांचा बेछूट मारा केला. विशेष म्हणजे भारत-पाक सीमेवर तैनात असेल्या दोन्ही देशाच्या सुरक्षादलाने ईद-उल-फितरनिमित्त एकमेकांना मिठाईचे वाटप करत शुभेच्छा दिल्या होत्या. यापूर्वी येथे शस्त्रसंधीचा भंग करत सुमारे 20 वेळा गोळीबार करण्यात आला होता. पाकिस्तानच्या विशेष दलाच्या पथकाने 2 वेळा घुसखोरी करुन नागरिकांवर हल्ला केला होता. यात 3 जवान शहीद झाले तर 4 नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यात 10 जवान जखमी झाले होते.

पाकिस्तानची दर्पोक्ती
सय्यद सलाऊद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा अमेरिकेचा निर्णय भारताच्या दहशतवादविरोधी रणनीतीच्यादृष्टीने एक मोठे यश मिळाल्याचे मानले जात असतानाच पाकिस्तानने आज सय्यद सलाऊद्दीनची पाठराखण केली. अशा लोकांना दहशतवादी घोषित करणे पूर्णपणे अयोग्य आहे. त्यामुळे आम्ही भविष्यात काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना राजकीय, राजनैतिक आणि नैतिक अशा सर्व पातळ्यांवर पाठिंबा देऊ, अशी दर्पोक्ती पाकने केली आहे.

पाक लष्कराने शस्त्रसंधीचा भंग करीत सीमेजवळील राजौरी जिल्ह्यातील भीमभेर गली परिसरात सोमवारी रात्री गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला आहे. या हल्ल्याला भारतीय सैन्यदलाने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
प्रवक्ता, भारतीय सैन्यदल