ईदच्या दिवशीही काश्मिरात दगडफेक; 10 जखमी

0

काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून पोलिसांनी ईदगाह मैदानात ईदच्या दिवशी नमाज अदा करण्याची परवानगी नाकारली होती, तरीही लोक मोठ्या संख्येने मैदानावर जमा झाले होते. यावेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.

त्यामुळे पोलिसांना नाईलाजास्तव अश्रूधुराचा वापर करावा लागला. यासोबतच अनंतनागमध्येदेखील जमाव आणि सुरक्षा दलाचे जवान आमनेसामने आले.