श्रीनगर – ईदच्या दिवशीही काश्मीर शांत नाही. शनिवारी ईदची नमाज झाल्यानंतर काही युवकांनी सैन्याच्या जवानांवर तुफान दगडफेक केली आहे. त्यांच्या हातात दहशतवादी संघटना आयएसआयएसआय आणि पाकिस्तानचे ध्वज होते. दगडफेक करणारे युवक पाकिस्तान समर्थनाचे नारे देते होते. मीडिया रिपोर्टसनुसार, दगडफेक करणाऱ्या युवकांना नियंत्रित करण्यासाठी सैन्याने अश्रूधुराचे नळकांडे फेकले, यामुळे जमाव आणखी भडकला.
ईदच्या दिवशीही पाकिस्तानच्या कुरापती थांबलेल्या नाही. पाकिस्तानकडून राजौरी जिल्ह्यातील नौशेरा येथे गोळीबार करण्यात आला, यात जवान विकास गुरुंग शहीद झाले. जम्मू मधील अरनिया सेक्टरमध्ये शनिवारी सकाळी 4 वाजेला पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. बीएसएफने याला चोख प्रत्युत्तर दिले. सांबा सेक्टरमध्ये शनिवारी दोन पाकिस्तानी तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे वय अनुक्रमे 22 आणि 31 आहे. हे दोघेही पाक नागरिक आहेत.
बॉर्डरवर तणाव
शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे अटारी बॉर्डरवर तणावाचे वातावरण आहे. दरवर्षी ईदच्या निमित्ताने बीएसएफ आणि पाकिस्तानी रेंजर्स हे एकमेकांना मिठाई देतात, ही आदान-प्रदान यंदा झालेली नाही. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले, ‘ईद हा आनंदाचा सण आहे. या निमित्ताने काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी दुआ करतो.’