नंदुरबार । रमजान ईद (ईद -ऊल-फित्र )सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अधिनियमानुसार मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत त्यानुसार ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दि.23 जूनपासून मनाई आदेश लागू केले आहेत.यादरम्यान दि. 4 जुलैला आषाढी एकादशी असून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे अथवा पालखींचे आयोजन केले जाते. 23जुन ते सहा जुलै रोजी रात्री 11 वाजे पर्यंत हे आदेश लागू आहेत.या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात आहेत.जिल्ह्यात मनाई आदेश काळात सभा,मिरवणुका,मोर्चे,ध्वनीक्षेपके यांच्यावर बंदी आहे.