ईव्हीएमविरोधात विरोधक एकवटले; २१ ऑगस्टला मोर्चा

0

मुंबई: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयानंतर ईव्हीएमवर संशय व्यक्त करत विरोधक एकवटले आहे. ईव्हीएमविरोधात मुंबईत विरोधी पक्षांनी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. २१ ऑगस्टला मुंबईत हा मोर्चा निघणार आहे.

वांद्रे येथील एमआयजी क्बलमध्ये आज शुक्रवारी ‘ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा’ या बॅनरखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधकांना एकत्र आणणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील, ‘लोकभारती’चे कपिल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, भाकपचे प्रकाश रेड्डी आदी नेते यावेळी उपस्थित होते.