धुळे। राष्ट्रव्यापी लोकतंत्र बचाओ आंदोलनाच्या माध्यमातून भारतात 30 राज्यात 550 जिल्ह्यांत एकाचवेळी ईव्हिएम वापराच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या अंतर्गत शनिवार 25 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, विधानसभांच्या तसेच महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगर पालिका निवडणूकीत व यापूर्वींच्या 2014च्या लोकसभा व राज्याच्या विधानसभा निवडणूकीत इव्हिएम मशिनमध्ये काही पक्षांकडून छेडछाड करण्यात आली आहे. त्या विरोधात निवडणूक आयोग व न्यायालयात विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून तक्रार करूनही कागदी मतपत्रिकांचा वापर न करात इव्हिएम मशिनचा वापर करण्यात येत आहे.
उपजिल्हाधिकार्यांना दिले निवेदन
निवडणूका निष्पक्ष व पारदर्शी वातावरणात पार पडत नसल्यामुळे पुन्हा कागदी मतपत्रिकांचा वापर सर्व प्रकारच्या निवडणूकांमध्ये केला पाहिजे अशी मागणी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या आंदोलनात संघटनेचे जिल्हा संयोजक प्रा. महादेव जमदाडे, राजेंद्र पाटील, कमलाकर सौदाणकर, भावराव सोनवणे, राजदिप आगळे, भूषण पाटील, प्रदिप शिंदे, संदिप थोरात, प्रकाश वाघ, दिनेश मोरे आदी उपस्थित होते.