ईशा अंबानीचा जिओ फायबर लाँचिंग ट्विट फेक

0

मुंबई | भारतीय अरबपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ कंपनी दिवाळीला एक धमाका उडवणार आहे. कंपनी होम ब्रॉडबॅण्ड सेवा जिओ फायबर लाँच करणार आहे. यात ग्राहकांना ५०० रुपयात १०० जीबी डेटा मिळणार आहे. इतकचे नाही तर स्पीडही एक जीबी प्रति सेकंद मिळेल. असे ट्विट मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या नावे बनविलेल्या ट्विटर अकाऊंटवरून प्रसारीत झाले होते. मात्र रिलायन्स जिओने हे अकाउंट फेक असल्याचे स्पष्टीकरण केले आहे.

डिसेंबर २०१५ मध्ये आशियातील आगामी टॉप बिझनेसमन या यादीत ईशा अंबानीचा उल्लेख होता. ती भाऊ आकाश अंबानी, ब्रांड एम्बेसेडर शाहरूख खान यांच्यासमवेत जिओ लाँचिंगमध्येही सहभागी झाली होती. रिलायन्स जिओ इन्फोकॉम प्रमाणेच जिओफायबर लाँचिंग झाले तर भारतात इंटरनेट सेवा पुरविणाऱ्यांमध्ये सेवा शुल्कावरून युद्धच होईल.