‘बॅटल ऑफ सारागढी’ या चित्रपटाच्या निर्मितीची सूत्र मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने आपल्या हातात घेत बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. सुरुवातीला या चित्रपटाची निर्मिती सलमान खान आणि करण जोहर हे दोघे मिळून करणार होते. पण सलमानने या प्रोजेक्टमधून कालांतराने काढता पाय घेतल्यामुळे या चित्रपटाच्या भवितव्यावर टांगती तलवार होती. पण ईशाने ऐनवेळी ‘बॅटल ऑफ सारागढी’ची निर्मिती करायची तयारी दाखवली. अक्षय कुमार या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे.
करणच्या घरी काही दिवसांपूर्वी अक्षय आणि ईशाची यासंदर्भात एक बैठक झाली. ईशाला या चित्रपटाची कथा यावेळी आवडली. त्यानंतर 29 ऑगस्टला पुन्हा अक्षयच्याच घरी करण आणि रेश्मा शेट्टीची अंतिम बैठक झाली आणि हा प्रोजेक्ट मार्गी लागला. दुसरीकडे ‘बॅटल ऑफ सारागढी’वर राजकुमार संतोषी आणि अजय देवगणही चित्रपट करत असल्यामुळे या दोन्हींपैकी आता कोणता चित्रपट सरस ठरणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. 36 शीख रेजिमेंटच्या 21 जवानांच्या मदतीने सुमारे 10 हजार अफगाणी सैनिकांविरोधात लढाई करून सारागढीच्या किल्ल्यावर विजय मिळवला होता. त्या 21 जवानांच्या शौर्याची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.