जळगाव । शहरातील ईश्वर कॉलनी येथील रहिवासी बाविस वर्षीय विवाहीतेचा विनयभंग झाल्याची तक्रार औद्योगीक वसाहत पोलिसात दाखल करण्यात आली आहे. सासूच्या मानलेल्या भावाचे घरात येणे-जाणे असल्याने त्याने घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत सुनेचा हात धरुन अश्लील वर्तन केल्याची तक्रार पिडीतेने आपल्या पतीकडे केल्याने पतीने आईच्या या मानलेल्या भावाला बेदम झोडपून काढत पोलिसांच्या स्वाधीन केले.
अन् पतीला सांगितली हकीकत
जळगाव शहरातील ईश्वर कॉलनी परिसरात एकत्रकुटूंबात वास्तव्यास असलेली विवाहीतेचा प्रेम विवाह झाला आहे. सासूबाई चा मानलेला भाऊ मुकेश चंद्रभान मंधाण याचे घरात येणे-जाणे होते. पिडीतची सासूबाई घटनेच्या दिवशी 15 नाहेंबर रोजी बाहेर गेली होती,कुटूंबातील पति-सासरे, दिर सर्व कामावर असतांना मुकेश मंधाण घरात शिरला याने अंगलट करुन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. घडला प्रकार कसा सांगायचा या विवंचनेत असतांनाच बुधवारी मुकेश मंधाण याने पिडीतेच्या मोबाईलवर फोन केला. मात्र हा फोन देरानीने उचलला, परिणामी त्रास वाढत असल्यो पाहुन पिडीतेने घडला प्रकार पतीसह सर्वांना सांगीतला.
विनयभंगाची नोंद
आज दुपारी पिडीतेच्या पतीने आईचा मानलेला भाऊ मुकेश मंधाण याला बोलावून जाब विचारल्याने त्यावरुन वाद होवून मुकेशची यथेच्छ धुलाई करीत औद्योगीक वसाहत पोलिसांच्या स्वाधीन केले असून. पिडीतेच्या विनयभंग केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात येवुन मुकेश मंधाण याला अटक करण्यात आली आहे.