ईसिएच्या उपक्रमात विद्यार्थी झाले सहभागी

0

विद्यार्थ्यांनी जमा केले घरचे प्लास्टिक

पिंपरी- एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशनतर्फे शहरामधील सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांमधूनच ई-कचरा संकलन केले जाते. मोशीमधील श्री श्री राविशंकर विद्यालय आणि तळवडेतील राजा शिवछत्रपती प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील एकदाच वापरू शकणारे प्लास्टिक एका ठिकाणी जमा केले. तसेच विद्यार्थ्यांनी 29 किलो ई-कचरासुद्धा आणून इसिएच्या ताब्यात पुढील व्यवस्थापनासाठी आणून दिल्याचे इसिएचे संचालक आणि पर्यावरण तज्ञ विकास पाटील यांनी सांगितले.

मोशीत काढली प्रभात फेरी
मोशीमधील श्री श्री राविसंकर विद्यालयातील विद्यार्थ्यांसमवेत इसिए सदस्यांनी प्रभात फेरी काढली. सदस्यांनी पर्यावरणाच्या संवर्धना बाबत जनजागृती केली. तर तळवडेतील राजा शिव छत्रपती प्राथमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी ‘एक विद्यार्थी एक झाड’ या संकल्पनेत शाळेच्या आवारात वृक्षरोपण केले. दोन्ही शाळांमध्ये स्वतंत्रपणे कार्यक्रम राबविण्यात आले होते. त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा करण्यात आले. या प्रसंगी डॉ. अजित कदम, प्रभाकर मेरुकर, राहुल श्रीनिवास, म.न.पा. आरोग्य विभागाचे प्रभाकर तावरे, राजन उजीनवार, रमेश भोसले, श्री रिसायकलरचे विनीत बियानी उपस्थित होते. श्री श्री रविशंकर विद्यालयाच्या प्राचार्य कामाक्षी चितारी व राजा शिव छत्रपती प्राथमिक विद्यालयाच्या पल्लवी शेलार, मुख्याध्यापक गोवर्धन चौधरी, रेश्मा टिळेकर, उमा नेवाळे, जयश्री भिसे आदी मंडळी उपस्थित होती.

वृक्ष संवर्धनाचे महत्व समजावले
विद्यार्थ्यानी जमवलेले प्लास्टिक महापालिका आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आणि ई वेस्ट श्री रिसायकलरच्या ताब्यात देण्यात आले. प्रसंगी विकास पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिक बंदी बाबत सविस्तर माहिती व प्रबोधन साध्या सोप्या शब्दात समजावून सांगितले. वृक्ष संवर्धनाचे महत्व समजावून सांगितले. प्रत्येकाने आपल्या घरातील प्लास्टिक व ई कचरा महापालिका प्रशासनास दिल्यास आपले शहर स्वच्छ व सुंदर बनेल अशी अपेक्षा बाळगली. हा उपक्रम टप्प्या टप्प्याने संपूर्ण शहरात राबविला जाणार आहे .