ई कचरा जमा करणार्‍यांसाठी कापडी पिशवीचे बक्षीस

0

पर्यावरण संवर्धन समितीचा उपक्रम

निगडी : पर्यावरण संवर्धन समिती आणि रिव्हर रेसिडेन्सी फेज 1, 2 मधील सदनिका धारकांनी आपापल्या घरातील प्लास्टिक व ई कचरा एकत्रित करून पर्यावरण संवर्धन समितीच्या स्वाधीन केला. पिंपरी-चिंचवड महापालिका सहा. आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे यांनी उपस्थित महिलांना ‘शून्य कचरा’ उपक्रमाबाबत माहिती दिली व त्याचे फायदे तोटे समजावून सांगितले. इसिएच्या स्वयंसेवक सुषमा पाटील यांच्या हस्ते कापडी पिशव्यांचे प्रत्येक सदस्याला वाटप करण्यात आले.

रिव्हर रेसिडेन्सीच्या सदस्या सोनाली चिद्दरवार यांनी पुढाकार घेवून महिलांना एकत्रित करून विषयाचा प्रसार केला. कायम स्वरूपी दैनंदिन कचरा विलगीकरण करण्याची मानसिकता निर्माण होण्यासाठी इसिए सर्व ते मार्गदर्शन करेल असे इसिएचे संचालक विकास पाटील यांनी स्पष्ट केले. प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा सदनिका धारकांनी संकल्प केला आहे. या सोसायटीच्या महिला हा संदेश प्रत्येकी 100 जणांना देणार आहेत. प्लास्टिकचे घातक परिणाम यावर इसिए टीमने कल्पना दिली. यावेळी श्री रिसायकलरचे विकास आबले, प्रकाश जुकांतवार, दिनेश काहर, सोनिया साहू, रेणुका सोमनाथन, बाळू खाडे आदी उपस्थित होते.