पिंपरी : पर्यावरण संवर्धन समितीतर्फे संपूर्ण शहरात एकाच दिवशी एकाच वेळी ई-कचरा संकलन कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये 2.55 टन ई कचरा आणि 453 किलो प्लास्टिक जमा झाले. या उपक्रमात 800 स्वयंसेवक विविध 110 केंद्रांवर उपस्थित होते. या योगदानाबद्दल सहभागी सर्व स्वयंसेवकांचा सत्कार शनिवारी (दि.30) सकाळी साडेनऊला ऑटोक्लस्टर सभागृहात (चिंचवड) होणार आहे. यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर प्रमुख पाहुणे असतील, अशी माहिती समितीचे अध्यक्ष विकास पाटील यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.