रावेर । चौदाव्या वित्त आयोगाची कामे व इतर सर्व विकासकामे निविदा काढून करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील विवरे खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी रावेर यांच्याकडे केली आहे. विवरे खुर्द येथील विविध विकासकामे करण्यासंदर्भात येथील ग्रामपंचायत सदस्यांनी आपले म्हणणे पंचायत समिती प्रशासनास सादर केले.
गटविकास अधिकारी हबीब तडवी यांना विवरे खुर्द ग्रामपंचायत सदस्य नासिमबी पिंजारी, अर्चना विचवे व अशरफ शेख यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, येथील सरपंच व ग्रामविकास अधिकारी 14 वित्त आयोगाची व इतर विकास कामे निविदा न काढता परस्पर मर्जीतील लोकांना देत आहे. ग्रामपंचायतीला आलेला निधीत गैरव्यवहार होवु नये यासाठी ही कामे निविदा काढून करावी अशी मागणी करण्यात आली आहे.