ई-पबच्या माध्यमातून बेरोजगारांना मिळणार रोजगार

0

* हिरा फाऊंडेशनच्या माध्यमातून 100 विद्यार्थ्यांना दिले नियुक्तीपत्र
*आमदार शिरीष चौधरी व डॉ. रविंद्र चौधरी यांचा बेरोजगारी मुक्तीचा संकल्प

अमळनेर । अमळनेर विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार शिरीष चौधरी व हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ.रविंद्र चौधरी यांनी मतदार संघातील तरुण, युवक, युवती व महिलांना रोजगार उपलब्ध करण्याचा संकल्प हाती घेतला असून या माध्यमातून मतदार संघातील तब्बल तीन हजार व्यक्तीना ई-पब द्वारे 2018 संपेपर्यंत घरी बसल्या रोजगार मिळणार आहे. या उपक्रमांतर्गत सुमारे शंभर विद्यार्थी व युवकांना आमदार चौधरींच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

विशेष म्हणजे याअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांला आय.डी. देणे क्रमप्राप्त असून यासाठी प्रत्येकी 15 हजार रूपये खर्च लागत आहे व हा संपूर्ण खर्च हिरा फाऊंडेशन करत आहे. हा रोजगार मिळविण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नसून संबधित व्यक्तीला घरी बसूनच मोबाईलवर काम करून चांगला रोजगार मिळणार आहे. आतापर्यंत शेकडो युवक व विद्यार्थ्यांना या उपक्रमात रोजगार मिळाला असून विशेष म्हणजे महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दोन दिवसांपूर्वी 100 विद्यार्थ्यांना आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.