मंचर । आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथील जिल्हा परिषद शाळेला ग्रामपंचायतीच्या वतीने मदत करण्यात आली आहे. त्यामध्ये ई-लर्निंगसाठी एलईडी संच आणि लोखंडी कपाटे अशी 1 लाख 67 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आल्याची माहिती सरपंच संगिता पोखरकर आणि ग्रामविकास अधिकारी जनार्दन नाईकडे यांनी दिली.
पिंपळगाव खडकी ग्रामपंचायतीच्या वतीने 14 व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेस ई-लर्निंगसाठी तीन स्मार्ट एल.ई.डी.संच, होम थिएटर याप्रमाणे 97 हजार 990 रुपये तसेच शाळेकरीता 70 हजार रुपये किंमतीची 11 लोखंडी कपाटे प्रदान करण्यात आली. सरपंच संगिता पोखरकर, उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंकुश मारूती पोखरकर, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर बांगर, रशिदभाई इनामदार, दीपक पोखरकर, सीमा बांगर, सुजाता पोखरकर, धनेश पोखरकर यावेळी उपस्थित होते. निवृत्त शिक्षक शहाजी थोरात यांचे चिरंजीव उद्योजक मोहन थोरात व आदिनाथ थोरात यांनी मातोश्री कै. सुमन थोरात यांच्या स्मरणार्थ शाळेसाठी कपाट भेट दिले. कार्यक्रमाची व्यवस्था संगिता अडसरे, स्वाती बेल्हेकर, मंगल भालेराव, सुधिर चिखले, गणेश गावडे, संगिता इंदोरे, सचिन पालेकर, पुनम बांगर यांनी पाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन शेजवळ यांनी तर सुनील वाघ यांनी आभार मानले.