ई वेस्ट संकलनात बजाज शाळेचा पुढाकार

0

इसिए समवेत केला करार

आकुर्डी : पर्यावरण संवर्धन समिती सातत्याने पिंपरी चिंचवड शहराच्या ई कचरा समस्येबाबत प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी प्रयत्न करीत आहेत. जनजागरण करून प्रत्यक्ष कृती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या बाल मनावर पर्यावरणाचे संस्कार करीत आहे. यासाठी गुरूवारी कमल नयन बजाज शाळेने पर्यावरण संवर्धन समितीसह करार करण्यात आला. यानुसार विद्यार्थ्यांना घरातील ई कचरा, प्लॅस्टिक आणायला सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांनी जमा केला ई कचरा
इसिएचे अध्यक्ष विकास पाटील म्हणाले की, प्रत्येक शाळेतून आजपर्यंत ई कचरा व प्लास्टिक कचरा संकलनास मोठ्या प्रमाणात सहभाग मिळत आहे. आपले शहर लवकरच ह्या समस्येतून बाहेर पडेल असे आशादायक चित्र दिसत आहे. कमलनयन बजाज शाळेत इसिएच्या पर्यावरण दूतांच्या सहकार्याने सर्व विद्यार्थ्यांना केलेल्या आवाहना नुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरातील सुके प्लास्टिक, तुटकी खेळणी, प्लास्टिक बाटल्या त्याच बरोबर इलेक्ट्रॉनिक तुटकी खेळणी आणि उपकरणे शाळेत जमा केली. भविष्यात हा उपक्रम प्रत्येक शाळेतून कायम स्वरूपी घेतला जाणार असल्याने शैक्षणिक वर्ष 2018 -19 मध्ये याचा खरा परिणाम दिसून येणार आहे.

प्रसंगी कमलनयन बजाज शाळेच्या व्यवस्थापनाने सकारात्मक पुढाकार घेतला. पर्यावरण दूतांनी इसिला सर्व कचरा शिस्तबद्द आणि योग्य पद्धतीने हाताळण्यास मदत केली. इसिए संस्थापक अध्यक्ष विकास पाटील, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतच्या सह सचिव सोनाली कुंजीर, श्री रिसायकलचे विकास आंबले, प्रभाकर मेरुकर, दत्तात्रेय कुमठेकर, गोविंद चितोडकर, शाळा प्रशासना कडून सिस्टर प्रतिभा, गीता साळी, मनीषा सागांवकर, राजेंद्र महाजन आदी मंडळीने सहकार्य केले.