उंचावरून पडल्याने फुलगावच्या इसमाचा मृत्यू

Isma of Phulgaon died after falling from a height भुसावळ : उंचावरून पडल्याने फुलगाव येथील देविदास पंडित पाटील (35) यांचा मृत्यू झाला. देविदास पाटील हे उंचावरून पडल्याने त्यांना गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले होते मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
या प्रकरणी सीएमओ डॉ.नवरतन राजपूत यांच्या खबरीनुसार वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ करीत आहेत.