उंचावर होतो सेल्फीचा मोह….

0

जकार्ता – जकार्ता प्रशासनाने नव्याने तयार केलेल्या उड्डाणपुलावरून बाईकस्वारांना बंदी घातली आहे. इतक्या सुंदर पुलावरून लोकांना विशेषतः बाईकर्सना सेल्फी काढण्याचा मोह होईल आणि हा सेल्फी स्पॉट जीवाशी खेळ होऊ शकेल अशी भीती सरकारला वाटतेय.

जकार्तामधील वाहतूक यंत्रणेने पुलावरून बाईकस्वारांना बंदीचे समर्थन केले आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी ही बंदी असल्याचा दावा यंत्रणेने केला आहे. पुलावरील रस्ते एकमेंकांशी जुळतात ते अगदी फुलातील पाकळ्यांसारखे. ते रस्ते रंगीबेरंगी आहेत. रस्ते क्रॉस करण्याऐवजी सेल्फी काढीत बसलात तर अपघात नक्की होईल. जाकार्ताचे गव्हर्नर जारोट सैफुल हिदायत यांनी म्हणूनच बाईकवाल्यांना एक दिवस तरी पुलावरून जाऊ द्या ही मागणीही धुडकावून लावलीय. अमेरिकेतील कार्नेजी मेलोन विद्यापीठाच्या संशोधनाने सिद्ध केलंय की उंचावरून सेल्फी घेताना २०१४ पासून १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. इंडोनेशियातही हा सिद्धांत लागू आहेच.