उंटावद येथील युवकाचा अपघातात मृत्यू

0

शिरपूर । शिरपूर तालुक्यातील उंटावद येथील 17 वर्षीय युवकाचा नासिक लगत रेल्वेतुन पडून मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. सदर युवक हा मंबुई मालाङ येथे परिक्षा देण्यासाठी जात होता. तालुक्यातील उंटावद येथील तुषार दशरथ महाजन दोरीक (वय-17) हा गावातील 2 मित्रासमवेत मुबुई मालाड येथे जी.ई.ची परिक्षा देण्यासाठी 6 रोजी रात्री धुळे येथुन रेल्वेने निघाला पहाटे नासिक जवळ त्याचा तोल गेल्याने डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. सदर घटना आई वडीलांना समजताच त्यांनी हंबरडा फोडला. तो शिरपूर येथील एस.पी.डी.एम.ला 12 वीत शिकत होतात्यांचा शेवट पेपर झाल्यानंतर तो परिक्षा देण्यासाठी जात असंताना ही घटना घडली.