जळगाव। कर्जबाजारीपणाला कंटाळून 54 वर्षीय शेतकर्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना डांभुर्णी जवळ असलेल्या उंटावद येथे घडली. उंटावद येथील शेतकरी संतोष जगतराव पवार यांच्या शेतात बिजासिनी मातेचा मंदिर आहे. गुरुवारी सकाळी 11 रोजी नेहमीप्रमाणे आरती करण्यासाठी मोबाइृल सोबत न घेता शेतात गेले.
रात्री पर्यत संतोष पवार घरी आले नाही त्यांचा शोध घेतला असतो ते मंदिराच्या ओट्यावर मृतावस्थेत आढळून आले. कर्जबाजारीपणा, नापिकी यामळे संतोषने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. दोन दिवसांपुर्वी झालेल्या वादळी पावसाने पवार यांच्या शेतातील केळीचे नुकसान झाले होते. तसेच तीन महिन्यापुर्वी उसनवारीने पैसे घेऊन मुलीचे लग्न केले होते. शवविच्छेदनासाठी आलेल्या मृतदेहाचे कायमस्वरुपी डॉक्टर नसल्याने दुसर्या दिवशी दुपारी दोनला शवविच्छेदन झाले. त्यांच्यावर उंटावद येथै अत्यंसंस्कार करण्यात आले.