जळगाव । तालुक्यातील उंबरखेड ग्रा.पं.ची निवडणूक 4 महिन्यांवर येऊन ठेपली असून निवडणुक कार्यक्रमानुसार प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. प्रभाग रचना करतांना प्रभाग क्रमांक 2 व 3 या प्रभागाची चुकीच्या पद्धतीने रचना करण्यात आली असून त्यात बदल करावा अशी मागणी उंबरखेड येथील भरत दामू पाटील यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे हरकत घेऊन मागणी केली आहे. भरत पाटील यांनी 10 रोजी प्रभाग रचना हरकत अर्ज तहसीलदार यांच्याकडे दिला असून त्यात तालुक्यातील उंबरखेड ग्रामपंचायतीत नियम 5 (2) नुसार प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. प्रभाग क्रमांक 2 हा गल्ली नंबर 3 च्या पश्चिमच्या बाजूला आहे. रचनेमध्ये पूर्ण गल्ली एका प्रभागात यायला पाहिजे तसे न करता प्रभागाचे दोन भाग करण्यात आले आहे.