नारायणगाव । जुन्नर तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल निवडणूक निर्णय अधिकारी के. बी. मोरे यांनी नुकतेच जाहीर केले. यात उंब्रज 1 या गावात सामाजिक कार्यकर्त्या सपना उमेश दांगट 130 मताधिक्याने सरपंच पदी निवडून आल्या. तर सदस्य पदी वार्ड क्र. 3 मधून सुदर्शन दत्तात्रय काकडे हे निवडून आले आहेत.
उंब्रज 1 या गावचे सामाजिक कार्यकर्ते स्वर्गवासी माधव दांगट यांच्या सपना या सून आहेत. माधव यांनी सर्व सामान्य जनतेला सोबत घेऊन अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यांच्य कार्यामुळे सपना दांगट सरपंच पदी विराजमान झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या सविता दांगट यांनी दिली. या गावामध्ये महालक्ष्मी पॅनेलचे दहा सदस्य बिनविरोध निवडून आल्यामुळे फक्त सरपंच आणि प्रभाग 3 चे एक सदस्य या दोनच जागांसाठी निवडणूक झाली. बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांमध्ये रोहन निकम, वृषाली हांडे, रामदास हांडे, अंबादास हांडे, रेश्मा हांडे, स्नेहल राऊत, योगिता हांडे, प्राजक्ता रसाळ, सुनंदा हांडे, गणेश हांडे यांचा समावेश आहे.