नवापुर। तालुक्यातील मौजे उकळापाणी वनक्षेत्रात वनअतिक्रमण काढल्याच्या रागातुन नवापुर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रथमेश विठ्ठल हाडपे यांना त्यांच्या निवासस्थानी झाल्याची मारहाण झाल्याची घटना घडली. यामुळे एकच खडबड उडाली असुन शासकीय कर्मचारी यांच्यात भितीचे वातारण पसरले असून या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. भाविन रमेश कोकणी (रा.रायपुर) याने सायंकाळी शासकीय निवासस्थानात वनक्षेत्रपाल हाडपे हे आराम करीत असतांना भावीन कोकणी यांने घरात घुसुन त्यांच्यासोबत हुज्जत घालत थेट लाथाबुक्यांनी मारहाण केली. भावनी याने हाडपे यांना शिवागाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
अधिकार्याला मारहाणीची तिसरी घटना
यावेळी जंगलातील अतिक्रमण संपुर्णपणे काढण्यात आले असुन तेथील झोपड्या व लाकुड तोडण्याचे अवशेष दिसुन आले होते. वन परिक्षेत्र अधिकारी हडपे यांनी आपला जीव धोक्यात टाकुन डॅशिंग कारवाई केल्याने वनतस्कर व वन अतिक्रमणधारक धास्तावले आहे. याचा राग त्यांचावर असुन या कारवाईमुळे त्यांना मारहाण झाली आहे. शासकीय अधिकारी यांना मारहाण करण्याची ही तिसरी घटना आहे घडली आहे.
नवापुर पोलीसांत गुन्हा
शासकीय कर्मचार्यांला मारहाण करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला म्हणुन नवापुर पोलिस स्टेशन येथे फिर्यादी वनक्षेञपाल हाडपे यांनी आरोपी भावीन कोकणी (वय 32) रा रायपुर यांचा विरुध्द भाग-5 गुरनं 198/,2017 भादवि कलम 451,452,353,332,504,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बबन सुर्यवंशी पो.का अनिल राठोड करीत आहे.
वनविभागाने बुलडोझर फिरविले
उकळापाणी राखीव वनक्षेत्रात अतिक्रमण करीत शेती करणार्या 9 हेक्टर क्षेत्रावर वनविभागाचा बुलडोझर फिरविण्यात आले आहे. तसेच कारवाईस अतिक्रमणधारकांनी मज्जाव करण्यासाठी तीन हेक्टर क्षेञात जे.सी.बीच्या साहाय्याने सखोल जलशोषक खोदुन काढण्यात आला. वनविभागाकडुन हे अतिक्रमण काढण्याअगोदर अतिक्रमण धारकांना तीन वेळा नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी अतिक्रमण काढले नव्हते. वनविभागाने मोठा फौजफाटा घेऊन हे अतिक्रमण काढले आहे.