उघड्यावरील शौचास अटकावासाठी व्हायफाय

0

जळगाव । शहरातील शिरसोली नाका चौकाजवळील गणपती नगरातील रस्त्यावर उघड्यावर शौचास बसणार्‍यांना अटकाव करण्यासाठी महापालिका प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र, तरीही या ठिकाणी हगणदारीमुक्ती होत नसल्याने आता परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने महापालिकेने या ठिकाणी बाके बसवून सांयकाळी दोन तास मोफत इंटरनेट व्हायफाय देण्याच्या निर्णय घेतला आहे. आज मराठी प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी वृक्षरोपण देखील करण्यात आले.

हगणदारीमुक्त करण्यासाठी उपाययोजना
शहराच्या हगणदारीमुक्तीसाठी महापाकिलेकडून गेल्या वर्षात अनेक उपाययोजना राबविण्यात आल्यात. शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी 31 मार्च 2017 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्या अनुषंगाने जळगाव शहर हागणदारीमुक्त झाल्याचे 14 मार्च रोजी आयुक्त यांनी जाहीर केले होते. मात्र शासनाच्या समितीने केलेल्या तपासणीत शहर हगणदारीमुक्त नसल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला होता. शहरात उघड्यावरील शौचालयाचे 58 ठिकाणे आढळून आली होती. यापैकी शिरसोली नाका चौकातील गणपती नगरातील एक ठिकाण होता. हे ठिकाण हगणदारीमुक्त करण्यासाठी गेल्या अनेक वर्षात अनेक उपाययोजना करण्यात आल्यात. परंतु, त्या प्रयत्नांना यश आलेले नाही. हागणदारीस अटकाव करण्यासाठी याठिकाणी एक भिंत उभारण्यात आली आहे. तसेच या जागेचे शुशोभीकरण करण्यात येत आहे. आज मराठी प्रतिष्ठानकडून या ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले. मराठी प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले. महापालिकेतर्फे येथे ओपन जीमचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. उघड्यावर शौचास जाणार्‍यांना इतर भागात आळा बसला असला तरी या भागाता प्रशासनाला यश आले नव्हते. येथे बाके बसविण्याची नागरिकांनी मागणी केली असता महापौर व आयुक्तांनी त्यांची मागणी मान्य केली आहे. मोफत व्हायफाय सुविधा दिल्याने येथे तरूण तरूणींचा वावर वाढल्याने उघड्यावरील शौचास जाणार्‍यांने पर्याये अटकाव करता येणार आहे. मोफत व्हायफाय देणार्‍या व्यावसयिकाच्या कल्पकेतचे कौतुक महापौर नितीन लढ्ढा यांनी केले आहे. यामुळे हा भाग हागणादारी मुक्त होण्यास मदत होणार आहे. उघड्यावरील शौचास जाणार्‍यांना हा एक अनोखा उपक्रम आहे.

दोन तास इंटरनेट व्हायफाय देण्याची तयारी
उघड्यावरील शौचास अटकाव करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी बाके बसवून देण्याचे आज महापौर व आयुक्त यांच्याकडे मान्य केले. तसेच या रस्त्यावरील व्यावसायिकाने या ठिकाणी सायंकाळी दोन तास मोफत इंटरनेट व्हायफाय देण्याची तयारी दर्शविली. व्हायफाय कनेक्ट करण्यासाठी सांयकाळी तरुण तरुणी या ठिकाणी बसतील त्यामुळे या प्रकारास आळा बसेल अशी अपेक्षा असल्याची माहीती महापौर नितिन लढ्ढा यांनी दिली. वृक्षरोपण कार्यक्रमासाठी महापौर नितिन लढ्ढा, आयुक्त जीवन सोनवणे, प्रतिष्ठानाचे विजय वाणी, प्रमोद बर्‍हाटे, जमिल देशपांडे, नगरसेविका ज्योती चव्हाण व पुथ्वीराज सोनवणे उपस्थित होते.