जळगाव । स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत उघड्यावर शौचास जाणार्या आठ नागरिकांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमान्वये गुरूवारी दंडात्मक कारवाई करण्यात आली़ सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास आरोग्य विभागाच्या पथकाने ही कारवाई पिंप्राळा सावखेडा परिसरात केली.
यात उघड्यावर जाणार्यांकडून प्रत्येकी 100 रूपयांचा दंड घेतला. आरोग्य अधिकारी डॉ़ विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक एस. पी. अत्तरदे व एल. बी. धांडे, आर. डी. पाटील, आरोग्य निरीक्षक व कर्मचारी अशा पथकाने गुरूवारी ही कारवाई केली. यात शरद सोनवणे, निखिल शिवटे, मुकेश ओनासे, सागर रोकडे, योगेश सोनवणे, किशोर जाधव, सुभाष सपकाळे, इच्छाराम पावरा यांच्यावर कारवाई केली.