उघड्यावर लघूशंका भोवली, पालिका कर्मचार्‍यास दंड

0

एक पाऊल स्वच्छतेकडे ; मुख्याधिकार्‍यांनी घातला आदर्श पायंडा

भुसावळ – अस्वच्छतेबाबतीत आलेल्या क्रमांकानंतर पालिका प्रशासन अलर्ट झाले आहे तर जिल्हाधिकार्‍यांनीदेखील भुसावळच्या स्वच्छतेकडे लक्ष घातल्याने शहरात सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनीदेखील याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या आवारात उघड्यावर लघूशंका करणार्‍या पालिकेच्या वसुली विभागातील कर्मचारी मोहन प्रकाश भारंबे यांना एक हजार रुपये दंड आकारल्याने पालिकेच्या कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली तर बाहेर एक गृहस्थ पालिकेच्या लघूशंकेसाठी आल्यानंतर त्यास पालिका आवारातील गवत काढण्याची शिक्षा सुनावण्यात आली. पालिका आवारात शौचास बसणे तसेच उघड्यावर लघूशंका करण्यासह थुंकण्यास मनाई करण्यात आली असताना काही लोक नियम धाब्यावर बसवत असल्याने मुख्याधिकार्‍यांनी सोमवारी कारवाई करताच मोठी खळबळ उडाली.