लातूर । केंद्र व राज्य शासनाच्यावतीने स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात राबवले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून लातूर महानगरपालिकेतसुध्दा स्वच्छता विभागाच्यावतीने विविध कामे सुरू करण्यात आलेली आहेत. यामध्ये विशेषत: घर तिथे शौचालय उभारणीस प्राधान्य दिलेले असून उघड्यावर शौचास जाणार्याविरुध्द कडक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. या कारवाईचा भाग म्हणून मनपा क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने दोघा लोटा बहाद्दरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
मनपाची कठोर कारवाई
अटक करण्यात आलेले लोटा बहाद्दर उघड्यावर शौचास जाणार्यांचे आधार व रेशनकार्डही रद्द करण्यात येणार असल्याची कठोर भूमिका मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच शौचालयाचे अनुदान घेवूनही शौचालय न बांधणार्यांच्या विरुद्धही मनपा लवकरच कारवाई सुरू करणार आहे. यामुळे लातूर महानगर पालिकेने लोटा बहाद्दरांच्याविरोधात सुरू केलेल्या कारवाईला कितपत यश मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल