उघड्या घरातून दोन मोबाईल लंपास

0

जळगाव । गेंदालाली मिल परीसरात उघड्या घरातून अज्ञात चोरट्यांनी दोन मोबाईल लंपास केल्याची घटना घडली असून शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, संजय प्रकाश जैयस्वाल (वय-34) रा. गेंदालाल मिल परीसर हे सायंकाळी राहत्या घरातील पुढच्या हॉलमध्ये 5 हजार आणि 7 हजार 500 असे एकुण 12 हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल चाजिंगला लावून घरातील मागच्या घरात नातेवाईकांसह बोलत बसले. पुढच्या रूममध्ये कोणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दोन्ही मोबाईल लंपास केले. संजय जैयस्वाल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एएसआय वासुदेव सोनवणे करीत आहे.