मुक्ताईनगर । तालुक्यातील उचंदे येथील संत तुकाराम महाराज युवा फाउंडेशनतर्फे शिक्षकांच्या गौरवासह विद्यार्थ्यांना कायद्याचे मार्गदर्शनाचा उपक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती शुभांगी भोलाणे या होत्या. प्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी सुभाष नेवे, पोलीस निरीक्षक अशोक कडलग, संस्थेचे अध्यक्ष माणिक पाटील, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, गटशिक्षणधकारी जे.डी.पाटील, भागवत पाटील, सरपंच किरण तायडे, संचालक संदीप देशमुख, भगवान भोलाणे, जितेंद्र पाटील हे प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल प्राचार्य आर.ए.चौधरी, विनायक वाडेकर, शरद बोदडे व साहित्यिक अ.फ.भालेराव यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छबिलदास पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार एस.एम.बडगुजर यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना पोलीस उपविभागीय अधिकारी सुभाष नेवे यांनी सायबर क्राईमची माहिती, महिलांचे कायदे व मोबाईल तसेच टीव्हीचे दुष्परिणाम यांची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन पाटील, स्वप्नील पाटील, आकाश शेजोळे, पंकज सावरकर, विशाल ठाकरे, एन.आर.पाटील, जितेंद्र भोलाणे, पुरुषोत्तम पाटील, सुशांत ठाकरे व विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम केले.