Youth In Uchanda Dies due to Lightning Strike : Two Critical मुक्ताईनगर : तालुक्यातील उचंदे शिवारात वीज पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजता घडली. मंगळवारी दुपारी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाल्यानंतर उचंदे शिवारात माणिकराव जगन्नाथ पाटील यांच्या शेतात रोजंदारीने कामावर गेलेला तरुण शत्रुघ्न काशीाथ नमायते (35) हा अंगावर वीज पडलयाने जागीच ठार झाला तर या घटनेत शेतमालक माणिकराव पाटील यांचा मुलगा गणेश पाटील व एक अन्य मजुर मुकेश अशोक पाटील हे दोघे गंभीररीत्या भाजले गेले. जखमींना पुढील उपचारार्थ जळगावी हलविण्यात आले. संकेत पाटील व अमोल नमायते यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
तरुणाच्या मृत्यूने हळहळ
मयत शत्रुघ्न याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, भावेश (12), मुलगी वेदिका (6) असा परीवार आहे. शांत, मनमिळाऊ,साधा सरळ स्वभाव असलेला शत्रुघ्न मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. गावासह परीसरातुन या दुर्देवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. शासनाकडुन शत्रुघ्नच्या कुटुंबाला मदत मिळण्याची अपेक्षा आहे.