उचंद्यात गोवर रुबेला लसीकरणाबाबत रॅलीद्वारे पत्रक वाटप

0

मुक्ताईनगर- तालुक्यातील उचंदे येथील घाटे ए.एस.विद्यालय व ज्यु. कॉलेजच्यामार्फत गावातील सर्व नागरीकांना गोवर आणि रुबेला लसीकरणाविषयी सविस्तर माहिती व्हावी यासाठी घाटे गावातून सकाळी प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली तसेच जनजागृती पत्रक वाटप करण्यात आले. प्राचार्य आर.ए.चौधरी यांनी सखोल मार्गदर्शन केले तसेच प्रास्ताविक पर्यवेक्षक एस.एस.पाटील यांनी केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी यांच्या शंकांचे निराकरण करण्यात आले. गावातून प्रभात फेरी काढताना विद्यार्थ्यांनी रुबेलाविषयी घोषणा व जनजागृती वाक्य रचना सादर करून उपस्थित पालकांना व महिला वर्गाला महत्त्व पटवून दिले. राष्ट्रीय हरीत सेनेच्या विद्यार्थ्यांनी विशेष पत्रक वाटप करून नागरीकांच्या मनातील शकांचे पूर्णपणे निराकरण केले. हरीत सेना प्रमुख प्रशांतराज तायडे यांनी हरीत सेनेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एस.डी.पाटील, एम.बी.महाजन, एन.बी.गायकवाड, बी.डी.पाटील, एस.एम.बडगुजर, डी.पी.मस्कवदे, एस.पी.पाटील, पत्रकार छबीलदास पाटील, गावातील ज्येष्ठ नागरीक, पालक विद्यालयातील संपूर्ण शिक्षक व पालक यांची उपस्थिती होती.