उच्चभ्रू घरातील तरुण तरुणी झाले रफ्फुचक्कर

0

शहादा । येथुन दोन उच्चभ्रू समाजातील महाविद्यालयीन शिक्षण घेणारे तरुण तरुणी दि. 13 जुलै रोजी रफ्फुचक्कर झाल्याने शहरात चर्चेचा विषय झाला असुन मुलीच्या वडिलानी मुलगी हरविल्याची तक्रार शहादा पोलीसात दाखल केली आहे. महाविद्यालयीन तरुणी लोणखेडा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे ही तरुणी शहरातील उच्चभ्रू वसाहतीतील राहणारी असल्याने चर्चेचा विषय आहे. तर तरुण हा देखील लोणखेडा येथील उच्चभ्रू समाजातील आहे.

तरुण व तरुणी सज्ञान
मुलीच्या आई वडिलानी मुलाचे नाव मौखिक सांगुन गुपीत ठेवण्याचे सांगितले.तक्रारीत मुलाचे नाव देण्यात आलेले नाही. पोलीस आता रफ्फुचक्कर झालेल्या तरुण तरुणीचा शोध घेत आहेत.स्वत:पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यानी माहिती घेतली. आता रफ्फुचक्कर झालेले तरुण तरुणी विवाह करुन परततात की काय याकडे लक्ष लागुन आहे.तरुण व तरुणी सज्ञान असल्याने पोलीस प्रशासन सावधगिरीने पावुले उचलत आहेत. समाजात मुलीची बदनामी होणार नाही याची काळजी घेण्याबाबत मुलीच्या आई वडिलानी पोलीसाना सुचना दिल्या.शहर व परिसरातुन मुल व मुली गायब होण्याचा प्रकार नवा नाही असंख्य तरुण व तरुणी परप्रांतात विवाह लावुन परतल्याची अनेक घटना घडल्या आहेत. पण या प्रकरणाची खमंग चर्चा शहरात आहे.

दोघातील मध्यस्थ फरार
गेल्या अनेक दिवसापासुन हे दोन्ही एकमेकाना भेटत असत. दोघे अचानक गायब झाले आहेत. सायंकाळपर्यंत मुलगी घरी न आल्याने आई वडिल व नातेवाईकानी तिचा मैत्रीणीकडे तपास केला असता तपास लागला नाही. भ्रमणध्वनी ही बंद होता. लोणखेडा येथील ज्या तरुणाला ती भेटत असे त्याचा तपास मुलीच्या आई वडिलानी केला असता तो ही गायब झाल्याचे आढळुन आले. शेवटी पोलीसात तक्रार केली.