नवापूर। स्पर्धेच्या युगात शिक्षणाचे महत्व अधिक वाढले आहे.समाजातील विद्यार्थ्यांनी जीवनात उच्च ध्येय गाठण्यासाठी चिकाटी व जिद्द ठेवावी,आणि पुस्तकाला आपला मित्र बनवा कारण पुस्तकच आपले खरे गुरु आणि मार्गदर्शक असतात. शिक्षणातून माणूस समृद्धीकडे जात असतो विद्यार्थांनी उउच शिक्षण घेवून यशाचे शिखर गाठावे. समाजातील जेष्ठांना पुरस्कार देवून तसेच गुणवंत विद्यार्थ्याचा केलेला गुणगौरव नव्या पिढीला प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परीट मंडळाने केले आहे. हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन जि प चे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी केले. नंदुरबार जिल्हा परिट सेवा मंडळ व जिल्हा युवा मंडळातर्फे जिल्ह्यातील समाजाच्या गुणवंत विद्यार्थांना शिष्यवृत्ती वाटप,गुणगौरव व समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणार्या समाज बांधवांना समाज भूषण पुरस्कार तसेच मरणोत्तर समाजरत्न पुरस्कार कार्यक्रम नवापूर येथे झाला.
यांचा करण्यात आला सन्मान
यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र,व शिष्यवृत्ती देवून तसेच समाज उन्नतीसाठी योगदान दिल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष एकनाथराव रुपचंद बोरसे,दत्तुराव जंगू बच्छाव, लोटनराव बाबुराव धोबी,तुकाराम कथ्थु मोरे,रमेश नथ्थू भिलाणे, अमृतलाल छगनलाल बुंदेला,अशोक सीताराम शिरसाठ,अशोक डोंगर सूर्यवंशी,अरुण लोटन सोनवणे, यांना समाज भूषण तर स्व,गंगाराम सखाराम जाधव यांना मरणोत्तर समाजरत्न पुरस्कार त्यांच्या परिवाराला देवून गौरविण्यात आले.
परीट समाजाचे महत्त्व अनन्य साधारण
पुढे भरत गावित म्हणाले कि हात चालेल तर पोट भरेल या विचाराने जीवन जगणारा परीट समाज मूळतः गरीब असला तरी मेहनतीने समस्यांवर मात करीत आलेला आहे. म्हणून समाजाचा जीवन प्रवाहात अल्पसंख्यांक असलेला परीट समाजाचे महत्व अनन्य साधारण आहे. प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात,प्रा.महेंद्र बोरसे, अॅड. जगदीश कुवर, सुदाम पवार, दगडू निकुंम, डी. एम. काकूळदे, आनंदराव सूर्यवंशी, रामदास देवरे, छगन बच्छाव, चंद्रकांत मोरे, जगदीश चव्हाण, रवींद्र जाधव, चंद्रकांत जाधव, रमेश मोरे, हेमंत जाधव, राकेश बोरसे,राजेंद्र जाधव,भरत पवार, बाबूलाल बोरसे, संतोष काकूळदे,संतोष वाल्हे,पूनम चव्हाण,पंढरीनाथ ईशी,अशोक खैरनार,दगा खैरनार, शांतीलाल ठाकरे,लक्ष्मण बच्छाव,,गोकुळ बोरसे जिल्ह्यातील समाज बांधव,भगिनी ,विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष वामनराव मोरे,सूत्रसंचालन भटू जाधव तर आभार जिल्हा सरचिटणीस संजय चित्ते यांनी मानले.
मान्यवरांची उपस्थिती
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष भरत गावित तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेशाध्यक्ष एकनाथराव बोरसे,सुरतचे समाज अध्यक्ष रोहिदास सूर्यवंशी,उपाध्यक्ष दशरथ वाल्हे,उद्योजक,दीपक मोरे,नवापूरच्या नगरसेविका मेघा जाधव, शहादाच्या नगरसेविका योगिता वाल्हे,अनिल जाधव,प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र जाधव,प्रदेश संघटक लोटनराव धोबी,जिल्हाध्यक्ष वामनराव मोरे,जिल्हा महिला अध्यक्षा कमलबाई काकुळदे, विभागीय युवा अध्यक्ष अॅड. शशीकांत कुवर, जिल्हा युवा अध्यक्ष विठ्ठल बच्छाव, पंडित जगताप आदी उपस्थित होते.