अमळनेर। मूल्यांकन निकष पूर्ण केलेल्या शाळांची यादी घोषित करून उच्च माध्यमिक शाळांना 100 टक्के अनुदान मिळावे, यासाठी 18 जुलै रोजी शाळा बंद ठेवणे बाबत प्रांताधिकारी अमळनेर यांना महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा व कृती समितीचे वतीने निवेदन देण्यात आले. गेल्या सतरा वर्षांपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळेत विनावेतन काम करत आहेत. सदर शाळांचे मूल्यांकन करून तब्बल तीन वर्षे होऊन गेली तरी देखील अनुदानास पात्र शाळांची यादी घोषित करण्यात आली नाही व सदर शिक्षकांच्या पगाराची कुठल्याही प्रकारची आथिर्क तरतूद करण्यात आलेली नाही.
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षर्या
यासंदर्भात समितीने आतापर्यंत तब्बल 110 वेळा आंदोलन करुन देखिल शासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील व जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा मंगळवार 18 जुलै रोजी एक दिवसीय बंद पाळण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी निवेदन देताना मुकेश वाल्हे, पी.बी. पाटील, एस.एस.पाटील, के.बी.पाटील, आर.बी.पाटील, एस.पी.पाटील, डि.डि. पाटील, व्ही.एस. शिसोदिया, व्ही.एस. पाटील, जे.एच.सुर्यवंशी, आर.आर.पाटील, आर.बी.पाटील, पी.यु.पाटील, योगेश चौधरी यांच्या स्वाक्षर्या आहेत.