उच्छल येथे सुमोत खैर जातीचे लाकुड पकडले

0

चालकासह सव्वा लाखाचा मुद्देमाल ताब्यात
वनविभागाकडून गुन्हा दाखल
नवापूर :
शहरालगतच्या गुजरात राज्यातील उच्छल येथे 25 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30 वाजेला उच्छल वनक्षेत्रपाल उपेंद्रसिंग राहुलजी यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन तापी जिल्हा कटासवान गावाजवळ पांढर्‍या रंगाची टाटा कंपनीची सुमोची तपासणी करण्यात आली. त्यात खैर जातीचे लाकुड आढळून आले.

लाकडाची घ.न 46.786 एवढी असून त्याची किंमत 10 हजार 532 सह टाटासुमोची किंमत 1 लाख असा 1 लाख 10 हजार 532 हजाराचा मुद्देमाल पकडला आहे. यात वाहन चालक विनायक शिवाजी गावित (रा.बोरविहीर, ता.नवापूर, जि.नंदुरबार) याला ताब्यात घेऊन वनअधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा ताजा खैर लाकडाचा माल गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येत होता. हा मुद्देमाल वाहनासह उच्छलच्या रेज कार्यालयात ठेवण्यात आल्याची माहिती वनविभागातील सूत्रांनी दिली.